कर्नाटक सरकार मराठी माणसाला दडपण्याचे काम करत आहे. अशा प्रकारच्या दडपशाही प्रवृत्तीचा मी तीव्र निषेध करतो आहे. ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही!
३० जुलै २०१४ रोजी कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवर अमानुष अशा प्रकारचा दडपशाहीचा प्रकार केलेला आहे. बेळगावचे नामकरण 'बेळगावी' असे करण्यात आलेले आहे, ही गोष्ट, सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू असलेल्या केसचे प्रमुख कोर्ट कमिशनर यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये वाद चालू असताना बेळगावचे 'बेळगावी' नामकरण करणे योग्य नाही, असेही आम्ही त्यांना कळवलेले आहे.......